MPSC Combine Exam : ‘हॉल तिकीट’ व्हायरल; MPSC ने केला खुलासा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी  महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षा ३० एप्रिल रोजी होत आहे. तत्पूर्वीच 'टेलिग्राम'च्या एका ग्रुपमध्ये ही परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती शेअर केली गेली आहे. हॉल तिकिट शेअर केली गेली आहेत. संबधित टेलिग्रामवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहेत. आता या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( MPSC)  खुलासा  केला आहे.

MPSC Combine Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा खुलासा 

प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्‍या खुलाशात म्‍हटलं आहे की, "महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन दिली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्रामवर प्रसिध्द होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यानंतर आता बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. संबंधित चॅनेलवर प्रसिध्द प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा ( डेटा ) उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून, अशाप्रकारे कोणताही विदा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही."

आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या ॲडमिनविरुध्द सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांक परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, असेही एमपीएससीने स्‍पष्‍ट केले आहे. 

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news