केंद्रातील सत्ता गुजरातसाठी वापरली ः शरद पवार | पुढारी

केंद्रातील सत्ता गुजरातसाठी वापरली ः शरद पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गुजरातची निवडणूक एकतर्फीच होणार यात कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्यापुरते सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम निकालात दिसला. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये. ठोस कृती करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही. दिल्ली महानगरपालिकेचा निकाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे पवार यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना सांगितले.

गेली 15 वर्षे दिल्ली महानगरपालिकेत भाजपाची सत्ता होती ती आता राहिलेली नाही. हिमाचल प्रदेशची निवडणूक झाली. तेथे भाजपची सत्ता होती. तेथे भाजपला सत्ता गमवावी लागली. दिल्लीमधील राज्य आधीच गेले. याचा अर्थ हळूहळू बदल व्हायला लागला आहे, असे शरद पवार म्हणाले.

अधिक वाचा :

Back to top button