Krupal Tumane : शिवसेना खासदारांच्या बैठकीची केवळ अफवा; कृपाल तुमाने यांची स्पष्टोक्ती | पुढारी

Krupal Tumane : शिवसेना खासदारांच्या बैठकीची केवळ अफवा; कृपाल तुमाने यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. याच अनुषंगाने रामटेक लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शुक्रवारी रात्री काही खासदारांची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली होती. पंरतु, खासदारांच्या बैठकीची केवळ अफवा आहे. आपण गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्येच आहे, अशी स्पष्टोक्ती शनिवारी (दि.९) कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी ‘दैनिक पुढारी’ सोबत बोलताना दिली.

तुमाने (Krupal Tumane) यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत १० खासदार उपस्थित होते, अशी चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत असताना तुमाने यांच्या घरी शिवसेनेच्या खासदारांचीही बैठक सुरु होती, असे बोलले जात आहे. पंरतु, अशा प्रकारची कुठलीच बैठक झाली नसल्याचे तुमाने यांनी स्पष्ट केल्याने बैठक झाली की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच राहुल शेवाळे यांच्यासह काही खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली होती. या पत्रानंतर लोकसभेच्या प्रतोद पदावरून तत्काळ खासदार भावना गवळी यांना पक्षाने हटवले होते. या घटनाक्रमानंतर आमदारांपाठोपाठ खासदारही बंड करण्याच्या तयारीत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button