

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आगामी चार दिवस फक्त कोकण व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवेचे दाब फक्त कोकण व विदर्भात अनुकूल असल्याने त्या भागात चांगला पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र हवेचे दाब अनुकूल नसल्याने तेथे खूप कमी पाऊस पडत आहे. 28 ते 30जून या कालावधीत कोकण, विदर्भातच मुसळधार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, मान्सूनने रविवारी प्रगती करीत गुजरातसह राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगडकडे कूच केली आहे. पूर्वी मध्य अरबी समुद्रात वार्याची द्रोणीय स्थिती तयार झाल्याने कोकण व विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील 24 तासांतील पाऊस..(मि. मी.मध्ये)
कोकण :रत्नागिरी (120.6), देवगड (120), मालवण, लांजा (120), रामेश्वर 90.6, कणकवली (90.4), मध्य महाराष्ट्र: नेवासा (50.7), चांदवड (30.7), शेवगाव (20.2), महाबळेश्वर (20), मराठवाडा : औरंगाबाद (50.5), कन्नड (40.9), विदर्भ: तिरोडा (50.9), सावनेर (50.7), घाटमाथा : ठाकूरवाडी (20.2) कोयना (20.1), भिरा (10.1),
ऑरेंज अलर्ट (27 जून)
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग
यलो अलर्ट (28 ते 30 जून)
कोल्हापूर, सातारा, जळगाव, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नगर, जालना, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली,
गोंदिया, चंद्रपूर.
हेही वाचा