वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुण्याला 504 कोटी | पुढारी

वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुण्याला 504 कोटी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘पंधराव्या वित्त आयोगात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, देहू, पुणे खडकी येथील तीन कॅन्टोमेंट बोर्ड भागातील वायू प्रदूषणाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी पाच वर्षांसाठी तब्बल 504 कोटी रुपयांची तरतूद झाल्याने त्याचा विनियोग व्यवस्थित व्हावा, अशी अपेक्षा हवा प्रदूषणावरील कार्यशाळेत तज्ज्ञांसह विविध स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली.

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

परिसर संस्थेच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघात हवा प्रदूषणावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात झालेल्या तज्ज्ञांच्या गटचर्चेत या मुद्द्यावर चर्चा झाली. याबाबत परिसर संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हवा प्रदूषणावर काम करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने टास्कफोर्स तयार करण्यात आला आहे. यातील काही निधी दुसरीकडे वळवण्यात आला, त्यावर स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

मुंबई : मानखुर्दमध्ये पुन्हा अग्नीतांडव; गोदामांना भीषण आग

40 कोटींचा निधी वळवला

या टास्कफोर्समधील सदस्य परिसर, पर्यावरण शिक्षण केंद्र, स्वच्छ पुणे सेवा संस्था अणि बाणेर पाषाण लिंक रोड वेल्फेअर ट्रस्ट संस्थांच्या निदर्शनास आले की, ई-बससाठी 80 टक्के तरतूद आहे. त्यातून 40 कोटी निधी दुसरीकडे वळवण्यात आला असून, त्यातून 400 नॉल इलेक्ट्रिक कचरा संकलन वाहनांच्या खरेदीसाठी वापरला जाणार आहे. याबाबतचे पत्र पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिले आहे.

राज्यात होणार आशियातील पहिले कायदा विद्यापीठ

कार्यशाळेत दिली तज्ज्ञांनी उत्तरे

या कार्यशाळेत याच विषयावर तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली. पुणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, आयआयटीएमचे निवृत्त संचालक गुफरान बेग, बेंगळुरू आयआयटीएमच्या शास्त्रज्ञ डॉ. प्रतिमा सिंग, रणजित गाडगीळ, डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांनी या पैशांच्या विनियोगावर आपले भाष्य मांडले. सकाळच्या सत्रात या सर्व तज्ज्ञांनी स्लाईड शोव्दारे आपले सादरीकरण केले. यात पुणे शहरातील हवा प्रदूषणासह मुंबई, दिल्ली, अहमदाबाद शहरातील हवा प्रदूषण यावर अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली.

Back to top button