पुण्याच्या विद्यार्थिनीची टॉयकॅथॉनमध्ये बाजी | पुढारी

पुण्याच्या विद्यार्थिनीची टॉयकॅथॉनमध्ये बाजी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल आयोजित टॉयकॅथॉन स्पर्धेत पुण्यातील इंदिरा नॅशनल स्कूलची विद्यार्थिनी श्रेया चंद्रकांत देशमुख हिने प्रथम पारितोषिक मिळवत बाजी मारली.

राज्‍यसभा निवडणुकीत भाजपला करायचा आहे घोडेबाजार : संजय राऊत

24 ते 26 मे दरम्यान ही स्पर्धा मानव रचना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फरिदाबाद दिल्ली येथे झाली. या स्पर्धेत 14 हजार 219 संघांनी सहभाग घेतला. यामध्ये श्रेयाच्या टीमने बायोस्कोपवर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक टॉय या स्पर्धेसाठी बनविले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व भागातून तिचे कौतुक होत आहे.

कुलगाममध्‍ये काश्मिरी पंडित शिक्षिकेची हत्‍या, शाळेत दहशतवाद्‍यांचा गाेळीबार

टॉयकॅथॉनसाठी मुंबई, पुणे, दिल्ली, कर्नाटक, चेन्नई, केरळ व अनेक राज्यांतून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान’अंतर्गत टॉयकॅथॉन-2021 ची संकल्पना भारतीय सभ्यता, इतिहास, संस्कृती, पौराणिक कथा आणि आचार यावर आधारित टॉय आणि गेम्सची संकल्पना मांडण्यासाठी, भारताच्या नावीन्यपूर्ण विचारांना आव्हान देण्यासाठी आहे. टॉयकॅथॉन 2021 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, महिला आणि बालविकास मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, एमएसएमई मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि माहिती मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलमार्फत आयोजित करण्यात येते.

हेही वाचा

राज ठाकरे लीलावती रूग्‍णालयात दाखल; उद्या शस्‍त्रक्रिया?

हार्दिक पटेलचं ठरलं ! २ जून राेजी करणार भाजपमध्‍ये प्रवेश

गॅस दराचा पुन्‍हा उडणार भडका? : जूनच्या पहिल्‍याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडर दर वाढण्याची शक्‍यता

Back to top button