निकालाअभावी पात्र शिक्षक होताहेत बाद! | पुढारी

निकालाअभावी पात्र शिक्षक होताहेत बाद!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

दोन वर्षांनंतर घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) निकालाअभावी राज्यातील लाखो शिक्षकांचेच भवितव्य अंधारात आले आहे. एकतर निकाल लागेना, त्यात वयोमर्यादा ओलांडली जात असल्याने पात्र असूनही अनेक शिक्षक बाद होत आहेत.

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

एक शिक्षक शेकडो विद्यार्थी घडवू शकतो, असे नेहमी बोलले जाते. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पूर्वी केलेल्या चुकांचा त्रास पात्र शिक्षकांना सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) 11 नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आली होती. राज्यातून 3 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देत शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले होते. परीक्षा होऊन सहा महिने उलटले तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून निकाल जाहीर केलेला दिसत नाही.

‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी

काही महिन्यांपूर्वी टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाला होता. पुन्हा तसाच प्रकार घडला तर पुन्हा हा विभाग बदनाम होईल, या भीतीने निकाल जाहीर करण्यास विलंब लावत आहेत. या धोरणामुळे पात्र शिक्षक केवळ वयोमर्यादा ओलांडत असल्यामुळे या पवित्र कार्यापासून वंचित राहणार आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर, ‘टीईटी’ परीक्षा दोन वर्षांपासून रखडली होती. त्यातच डी.एड्., बी.एड्. पात्रताधारक शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडल्याने टीईटी परीक्षेला नोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. त्यात दोन वर्षे परीक्षा न झाल्याने, यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली होती. प्राथमिक स्तरावरील पेपर-1 व माध्यमिक स्तरावरील पेपर-2 यासाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 60 हजार आहे.

नवज्योत सिंग सिद्धू कैदी नंबर २४१३८३, कारागृहात करणार क्लार्कचे काम

निकालाबाबत निर्णय होऊन शासनस्तरावर आदेश जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळेच निकाल लांबला आहे. लवकरच सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडून निकाल जाहीर होतील.

                                             – शैलजा दराडे, आयुक्त परीक्षा परिषद.

Back to top button