नगर : स्टीलचा एक कोटीचा साठा जप्त, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

नगर : स्टीलचा एक कोटीचा साठा जप्त, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद रस्त्यावरील खोसपुरी शिवारात मालवाहू वाहनातून स्टिलच्या सळया, पाईप चोरून काढून विक्रीसाठी साठा करणार्‍यांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने छापा घालून पकडले. त्यांच्याकडून एक कोटी 10 लाख 88 हजार 929 रुपयांचा साठा जप्त केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नगर : सावधान ! वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये भोंगा वाजवताय? होईल ही कारवाई

आदिनाथ रावसाहेब आव्हाड (रा. पांगरमल ता.जि.नगर), ऋषिकेश रामकिसन वाघ (रा. वाघवाडी ता. नेवासा), चेतन राजेंद्र हरपुडे, शिवाजी नामदेव कुर्‍हाटे, गोरक्षनाथ आसाराम सावंत (सर्व रा. शिंगवे तुकाई ता.नेवासा), तात्याराव अशोक सपरे, परशुराम अशोक सपरे (दोघे रा. महाकाळा ता.आबंड जि.जालना), शैलेश ज्ञानोबा तांदळे (रा. हिंगणी ता.जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत १ कोटी १५ लाखांची फसवणूक; बारामतीच्या लाकडी येथील घटना

नगर- औरंगाबाद रस्त्यावर खोसपुरी शिवारात पांढरीपुलाजवळ हॉटेल संग्राम पॅलेसच्या शेजारी मोकळ्या जागेत मालवाहू ट्रकमधील स्टिल चोरी करून काही लोक साठवणूक करीत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी रात्री खोसपुरी शिवारात छापा घालून कारवाई केली.

नाशिक : ओबीसी आरक्षणाकरीता भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

त्यात आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साठवणूक केलेले स्टिल, टेम्पो, लेटर, मालवाहू वाहने असा एक कोटी दहा लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस नाईक शकील शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button