अल्पवयीन मुलीचा विवाह; पाच जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

अल्पवयीन मुलीचा विवाह; पाच जणांवर गुन्हा दाखल

राहुरी : पुढारी वृत्तसेवा

दिनांक 20 मे रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणार्‍या मुलीच्या व मुलाच्या आई वडिलांसह मुलावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Kanika Kapoor : लग्नानंतर कनिकचे गौतमसोबत लिपलॉक (Photo Viral)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दिनांक 20 मे रोजी 16 वर्षे 7 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. आपली मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे लावून दिला.

फिटनेस नसल्यामुळेच वाहनांचा अपघात; वर्षभरात 18 हजार वाहनांवर कारवाई

याबाबत राहुरी पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीररित्या विवाह लावून देणार्‍यांवर कारवाई केली. पोलिस नाईक आजिनाथ पालवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी मुलीचे वडील राजेंद्र गंगाधर झारेकर, मुलीची आई अनिता राजेंद्र झारेकर, मुलगा विवेक जयानंद लोंढे, मुलाची आई निता जयानंद लोंढे, मुलाचे मामा मंगेश सुखदेव केदार या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

खा. संजय राऊत : इंधन दर कपात ही केंद्राचीच जबाबदारी

Back to top button