लाल महालप्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करा : संभाजी ब्रिगेड | पुढारी

लाल महालप्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करा : संभाजी ब्रिगेड

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचविले जात आहे. अशांवर प्रशासनाने त्वरित गुन्हे दाखल करून अटक करावी; अन्यथा होणार्‍या पुढील गोष्टींना प्रशासन जबाबदारी राहील,’ असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

ढालगावमध्ये वीज पडून 24 मेंढ्या ठार

लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने या कृत्याचा निषेध करण्यात आला व जिजाऊ-शिवरायांना पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदविण्यात आला. या वेळी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, अरविंद शिंदे, बाळासाहेब बोडके, कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, मंदार बहिरट यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पावसाळ्याच्या पार्शवभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती 10 जूनपर्यंत होणार

पासलकर म्हणाले की, हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. मात्र, पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षारक्षकांकडून उन्हाळ्याच्या सुटीतच लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र, दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. जिजाऊंसमोर असले नाच-गाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहे. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी या गाण्याचे चित्रण लाल महालात केले आहे. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे.

एक प्रकाशवर्ष म्हणजे नेमकं किती अंतर?

जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवले, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणे हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान आहे. या घाणेरड्या व्हिडीओसंदर्भात दोन-तीन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र, पोलिस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. या सर्व लोकांवर तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही मोहिते यांनी या वेळी केली.

Divya Khosla Kumar चा सेक्सी लूक पाहून फॅन्स म्हणाले

Back to top button