उत्पादनाचा खर्चही निघेना : कानवडेकांदा पिकाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकर्यांना प्रति एकर साधारण 40 ते 50 हजार रुपये खर्च येत आहे. मात्र सध्याच्या भावानुसार विचार केला, तर कांदा उत्पादक शेतकर्यांचा खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आहे त्या भावामध्ये आपल्या शेतातील कांदा विकत असल्याची खंत संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथील कांदा उत्पादक शेतकरी कारभारी रभाजी कानवडे यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना व्यक्त केली.