‘आरएसव्ही व इन्फ्लुएन्झा’वर आयसीएमआरमध्ये संशोधन

‘आरएसव्ही व इन्फ्लुएन्झा’वर आयसीएमआरमध्ये संशोधन
Published on
Updated on

दिनेश गुप्ता

पुणे : साथीच्या रोगावर संशोधन करणार्‍या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या म्हणजेच 'आयसीएमआर'च्या देशभरातील 20 केंद्रांमध्ये कोरोना रुग्णांच्या नमुन्यांमधील 'आरएसव्ही व इन्फ्लुएन्झा' या घातक ठरणार्‍या विषाणूंवर संशोधन केले जात आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) याबाबतचा अहवालही सरकारला पाठवला आहे.

'एनआयव्ही'च्या माहिती संशोधक डॉ. वर्षा पोद्दार यांनी दैनिक 'पुढारी'ला याबाबतची माहिती दिली. 'एनआयव्ही'ने संसर्गजन्य-साथीच्या आजारांवर संशोधन करून त्याचे निदान सुचवलेले आहे. एनआयव्ही ही आयसीएमआरची सर्वात महत्त्वाची संस्था आहे. जैववैद्यकीय संशोधनाची रचना, समन्वय आणि प्रसार करणारी ती भारतातील सर्वोच्च संस्था आहे. विषाणू किंवा विषाणूंचा एखादा समूह मानवी शरीराला हानी पोहोचवत असेल, अशावेळी त्यावर निदान करणे आणि प्रतिबंधासाठी संशोधन करणे आदी कामे एनआयव्ही करते.

या केंद्रात आतापर्यंत एड्स, रोटाव्हायरस गॅस्ट्रोएन्टेरिटिस, तीव्र रक्तस्राव, नेत्रश्लेष्मलाशक, रेबीज, हर्पस सिंप्लेक्स, बफेलोपॉक्स, गोवर आणि पोलिओमायलिटिस या आजारांच्या विषाणूंचा अभ्यास करण्यात आला होता. विशेष म्हणजे या केंद्रात 'अरबोव्हायरस आणि हेमोरॅजिक' या तापावर संशोधन आणि वेगवान निदानासाठी काम करण्यात आले आहे. 'एनआयव्ही'ने अंदमान आणि निकोबार बेटांसह देशातील 225 हून अधिक साथीच्या रोगांचा शोध घेतला आहे.

कोरोना अन् एनआयव्ही

कोरोना भरात असताना 'एनआयव्ही'त त्या विषाणूवर महत्त्वपूर्ण असे संशोधन केले गेले. या संस्थेने 11 मेपर्यंत भारताचे 'एलिसा' नावाचे पहिले स्वदेशी अँटिबॉडी चाचणी किट विकसित करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्वत्र सुटकेचा नि:श्वास सोडण्यात येत असला, तरी 'एनआयव्ही' मात्र पुढचे संशोधन करण्यात गुंतली आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी होत असले, तरी तो विषाणू पूर्णतः नष्ट होत नव्हता. म्हणून 'आयसीएमआर'च्या देशभरातील 20 केंद्रांतून जवळपास 83 हजार रुग्णांचे नमुने गोळा करून त्यावर संशोधन सुरू करण्यात आले. या संशोधनात 'एच3 एन 2 व एच1' यातील टाईप ए व टाईप बीमधील विषाणूवर काम करण्यात आले. कोरोनाचे विषाणू पावसाळ्यात म्हणजे जून-जुलैमध्ये पुन्हा पसरू शकण्याची शक्यता असून, तसे झाल्यास कोणते उपाय करण्याची गरज आहे, याचे संशोधन सध्या सुरू आहे.

कोरोना संपला असल्याची सर्वसामान्यांची भावना असली, तरी आम्ही थांबलेलो नाही. पावसाळ्यात पुन्हा हे विषाणू 'आरएसव्ही व एन्फ्लुएन्झा'च्या रूपात वाढू शकतात. असे झाले तर काय उपाय असतील, यावर संशोधन सुरू आहे. याचा अहवालही सरकारला पाठविण्यात आलेला आहे.

– डॉ. वर्षा पोद्दार, संशोधक, एनआयव्ही

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news