कोकण हापूसच्या नावाखाली होणारी अन्य राज्यांतील आंबा विक्री रोखा | पुढारी

कोकण हापूसच्या नावाखाली होणारी अन्य राज्यांतील आंबा विक्री रोखा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्या फळबाजारात आवक होत असलेला आंबा हा ज्या राज्यातून आवक झाला आहे, त्या राज्यातील मूळ जातीच्या नावानेच विक्री होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना पणन संचालक सुनील पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. इतर राज्यातील आंबा हा महाराष्ट्रात उत्पादित झालेला कोकण हापूस आहे, असे भासवून विक्री होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी. असे प्रकार आढळले तर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

श्रीनगर : सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; जवान शहीद, एक गंभीर जखमी

महाराष्ट्रात सुमारे 26 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. या उत्पादनांकरिता राज्यातील 29 संस्थांनी नोंदणी प्राप्त करून घेतली आहे. भौगोलिक मानांकनाचा (जीआय) उल्लेख करून शेतकर्‍यांनी मालाचे ब्रॅण्डिंग केल्यास संबंधित प्रदेशातील स्थानिक शेतकरी उत्पादकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळण्याची संधी प्राप्त होत असते. याकरिता भौगोलिक मानांकन प्राप्त नोंदणीकृत मालकी असलेल्या संस्था व नोंदणीकृत वापरकर्ता (उत्पादक शेतकरी) यांनी सजग राहण्याची गरज असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.

लखीमपूर खिरी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

काही वेळा बाजार समित्यांमध्ये इतर राज्यांतून आवक होत असलेला इतर जातीचा आंबा हा त्या त्या राज्यांच्या नावासह व आंब्यांच्या जातीसह विक्री न करता तो कोकण हापूस या नावाने बाजार आवारात विक्री होऊन महाराष्ट्रातील हापुस आहे, असे भासविले जाते. या बेकायदेशीर व अनुचित प्रकारामुळे ग्राहकांची दिशाभूल होते आणि पर्यायाने महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकनप्राप्त हापूस आंब्यांच्या विक्रीवर परिणाम होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते.

ग्राहकांना फटका; सीएनजी २.५ रुपयांनी महागला

‘मिस ब्रँडिंग’साठी रद्दीचाही वापर…

परराज्यातील व्यापारी हे त्या राज्यात उत्पादित झालेला आंबा हा महाराष्ट्रात उत्पादित झालेला कोकण हापूस आहे, असे भासवितात. त्याकरिता काहीवेळा महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची रद्दी त्या आंब्यांच्या वेष्टणासह (पॅकिंग) वापरतात, असेही दिसून आले आहे; किंवा महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये असा आंबा आल्यानंतर तो महाराष्ट्रातील कोकण हापूस आहे, असे भासविण्यासाठी ‘मिस ब्रँडिंग’ करून ग्राहकांची दिशाभूल करतात व आपल्या शेतकर्‍यांचे नुकसान होते. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

Back to top button