सोलापूर : होटगी वीज उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; सहा. अभियंत्याचे पद वर्षापासून रिक्त | पुढारी

सोलापूर : होटगी वीज उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; सहा. अभियंत्याचे पद वर्षापासून रिक्त

दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा होटगी महावितरण उपकेंद्राच्या कार्यालयातील सहायक अभियंता पद गत एक वर्षापासून रिक्‍त आहे. त्यामुळे या शाखेतील कामकाज पूर्ण होत नसल्याने येथील कामकाज रामभरोसे सुरू आहे. या शाखेत यापुर्वी सहाय्यक अभियंता पी. डी. राठोड हे कार्यरत होते, त्यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्‍त झाले आहे. सध्या येथील पदाचा अतिरिक्‍त कार्यभार महावितरणच्या जुनी मिल येथिल कार्यालयातील क्वॉलीटी कंट्रोल विभागाचे अभियंते चव्हाण यांच्याकडे आहे.

कॉलीटी कंटा्र्ेलच्या विभागाकडे तालुक्यातील सर्वच उपकेंद्राचा, आणि साखर कारखान्याचा कार्यभार आहे, त्यामुळे त्यांना होटगी उपकेंद्राकडे अधिक लक्ष देता येत नसल्याने या कार्यालयातील कामाचा बोजवारा उडत आहे. होटगी उपकेद्राच्या अखत्यारीत होटगी वीज उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; सहा. अभियंत्याचे पद वर्षापासून रिक्त15 गावे येतात या देखील गावांचा कामाचा ताण पडत आहे. तरी या कार्यालयास कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता नेमून येथील कामाचा निपटारा व्हावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Back to top button