अनुसूचित जाती समितीचा आ. प्रणिती शिंदे यांनी घेतला आढावा | पुढारी

अनुसूचित जाती समितीचा आ. प्रणिती शिंदे यांनी घेतला आढावा

सोलापूर : अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेत आढावा पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समिती अध्यक्षा आ. प्रणिती शिंदे व समिती सदस्य यांचा तीन दिवसीय दौर्‍यात पुणे महानगरपालिका परिसरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून झाली. पुणे महानगरपालिका येथे महानगरपालिकेच्या अनुसूचित जाती कल्याणासाठी असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कॅन्टोन्मेंटचे आमदार व समिती सदस्य सुनील कांबळे, यशवंत माने, लहू कानडे, राजेश राठोड, किरण लहामटे, लखन मलिक, अरुण लाड, टेकचंद सावरकर, राजू आवळे, नामदेव ससाणे तसेच पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते.

Back to top button