

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागा वाटपावरून मविआत धुसफूस नाही, नाराजी नाही. काल जागा वाटपाबाबत मातोश्रीवर बैठक झाली. राज्यात ४० खासदार मविआ जिंकून आणणार, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संबंधित बातम्या –
संजय राऊत म्हणाले, जो जिंकणार तोच लढणार , हाच आमचा फॉर्म्युला. मेरिटच्या आधारावर जागावाट करावं, हाच इंडिया आघाडीचा फार्म्युला आहे. आताच्या घडीला काँग्रेसचा एकही खासदार नाही. राज्यात ४० खासदार मविआ जिंकून आणणार आहे. भाजपची युती इव्हीएम मशीन सोबत झालीय. मविआ एकत्र येऊन लोकसभेच्या ४० जागा जिंकणार. सध्याच्या घडीला स्वबळावर निवडणूक लढेल, असा कोणताही पक्ष नाही.