Johnson’s & Johnson’s baby powder : जॉन्सन बेबी पावडरचा परवाना कायमचा रद्द
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जॅान्सन अँड जॉन्सन कंपनीच्या 'बेबी पावडर' (Johnson's & Johnson's baby powder) उत्पादनाचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. या प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवले होते. त्यानंतर उत्पादन पद्धती सदोष असल्याचे कारण देत अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.
जॉन्सन बेबी पावडरच्या (Johnson's & Johnson's baby powder) उत्पादन पद्धतीमध्ये दोष असून उत्पादनाचा पीएच निश्चित मानकानुसार नाही. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड येथील कारखान्यातील उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी सांगितले.
जॅान्सन अँड जॉन्सन कंपनीचे 'बेबी पावडर' (Johnson's & Johnson's baby powder) हे खास करुन नवजात शिशु व लहान बालकांसाठी वापरण्यात येत होते. या पावडरच्या उत्पादनातील पीएच हा प्रामणित करण्यात आलेल्या आलेल्या मानकानुसार आढळून आलेला नाही त्यामुळे याच्या उत्पादन पद्धतीमध्ये दोष आढळून आलेले आहेत. या पावडरच्या वापरामुळे नवजात शिशू व बालकांच्या त्वचेस हाणी पोहचण्याची शक्यता असल्यामुळे या पावडरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेत कंपनीच्या मुलुंड येथील कारखान्याचा उत्पादन परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
- SCO Summit 2022 : समरकंदमध्ये नरेंद्र मोदी पुतीन यांना म्हणाले, "आजचे युग हे युद्धाचे नाही"
- Nora Fatehi Clean Chit : सुकेश चंद्रशेखरनच्या प्रकरणात नोरा फतेहीला दिल्ली पोलिसांनी दिली क्लीन चिट
- पंतप्रधान-टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत ९ लाखांहून अधिक क्षयरोगग्रस्त घेणार सामाजिक सहकार्य; मनसुख मांडवीया
- Punjab Kings : पंजाब किंग्जच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा होताच प्रिती झिंटाची खुलली खळी!
- Rupali Bhosale : रूप सुंदरी तू मनमोहिनी ?❤️; रूपाली साज तुझा हा लयभारी (video)

