महापरिनिर्वाण दिन : दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

महापरिनिर्वाण दिन : दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेकांनी दादरच्या चैत्यभूमीला भेट देत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, राज्यपाल कोश्यारी यांनी संबोधित केले. (महापरिनिर्वाण दिन)

महापरिनिर्वाण दिन
महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिन : इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल

आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केले. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत आहोत. आज आपण केवळ महामानवामुळे जगामध्ये ताठ मानाने जगत आहोत. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वसामान्यांना अधिकार दिले, जगण्याचे हक्क दिले. त्या अधिकारांमुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य घरातील मुलगा मुख्यमंत्री झाला. राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. ते फक्त आंबेडकरांच्या संविधानाने.  मी बाबासाहेबांचा शतशः ऋणी आहे.  अनेक लोकांना मोठ्या पदावर जाण्याची संधी संविधानाने मिळाली. आंबेडकरांनी या देशाला, समाजाला मानवतेचा संदेश दिला. सर्वसामान्य लोकही त्यांच्या विचारांचा त्यांचा केंद्रबिंदू होता.  तळागाळातल्या लोकांना जगण्याचं बळ दिलं, वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिलं. दलितांच्या मनात रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली. आत्मविश्वास दिला. संविधानाने सर्वसामान्यांच आयुष्य फुलंलं. दलित बांधवामध्ये जो आत्मविश्वास आला तो फक्त केवळ आणि केवळ संविधानाने.

महापरिनिर्वाण दिन : बाबासाहेबांचा विचार, आठवणी इतिहास जपू

बोलताना मुख्यमंत्री असेही म्हणाले, "सरकार स्थापन झाल्यानंतर चैत्यभूमीवर येवून आम्ही अभिवादन केले. त्यांनी जो विचार दिला त्या विचारांच्या मार्गावर सरकार चालण्याचा निर्धार केला आहे. हे सरकार शोषितांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, गरिबांचे आहे. या सर्वांसाठी काम करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध राहील. हे सरकारने सामाजिक आणि लोेकभावनेतून निर्णय घेत आहे. महाराष्ट्र हे महात्मा फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचांरावर चालणार राज्य आहे. राज्यात शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवणार. स्वत:च्या पायावर उभा राहण्यास बळ देवू, विद्यार्थांना मदत करु, म्हणूनच आम्ही सत्तेवर चांगले निर्णय घेतले. बाबासाहेबांचा विचार, आठवणी इतिहास जपण्याचा काम केलं जाईल. इंदु मिलमधील भव्य स्मारक लवकरचं उभा करु. बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम प्रगतिपथकावर आहे, लवकरचं हे काम पुर्ण करु" असाही विश्वास त्यांनी यावेळी दिला.

संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं- राज्यपाल

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी जनतेला संबोधताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच कार्य  मोठं आहे. संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच कार्याकडून जगण्याची प्रेरणा मिळते. पुढे ते असेही म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी दिलेला संदेश समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर आजवर आपण चालत आहोत आणि चालत राहू.

आजचा दिवस डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचा – देवेंद्र फडणवीस

आज चैत्यभूमीवर येवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी जनतेला संबोधित करता ते म्हणाले, आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगाच्या पाठीवरचं संविधान दिलं आहे. देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं.  आज आमचा देश प्रगती करत आहे त्यापाठीमागे संविधान आहे. त्यांनी जो समतेचा, बंधुत्वाचा, मानवतेचा संदेश दिला आहे तो आपल्यासह जगाच्या कल्याणाचा संदेश दिला आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे. पुढे ते म्हणाले "इंदू मिलमधील स्मारकारचं काम लवकर पूर्ण करु. आज राज्य सरकारच्या वतीने मी आश्वासन देतो की त्याचा देखील कार्यक्रम लवकरच होईल."

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news