सातारा : राज्यपाल आणि दानवे यांचा निषेध, उदयनराजेंच्या समर्थकांनी टायर जाळून महामार्ग रोखला | पुढारी

सातारा : राज्यपाल आणि दानवे यांचा निषेध, उदयनराजेंच्या समर्थकांनी टायर जाळून महामार्ग रोखला

सातारा: पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या विधानाविरोधात त्यांच्यावर कारवाई होत नाही. याच्या निषेधार्थ आज (दि. ५) दुपारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सातारा शहराजवळ टायर पेटवून पुणे-बंगळूर महामार्ग रोखला. दरम्यान, या घटनेमुळे सुमारे अर्धा तास महामार्ग ठप्प होता.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याने सर्वत्र त्याचा निषेध केला जात आहे. यावर खा. उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत किल्ले रायगडावर आक्रोश आंदोलन केले. तर पुढील भूमिका आझाद मैदानावर मांडणार असा अल्टिमेट भाजप सरकारला दिला आहे. असे असतानाच भाजपचे मंत्री, पदाधिकारी बेताल वक्तव्य करायचे अद्याप थांबलेले नाहीत. यातूनच सोमवारी खा. उदयनराजे भोसले समर्थकांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे कडून साताऱ्याकडे येणाऱ्या लेनवर खिंडवाडीनजीक दुपारी २ च्या सुमारास ८ टायर पेटवून निषेध केला. या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली होती. तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीचे टायर बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button