Himachal Pradesh Exit Poll : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला संधी? भाजपसोबत कडवी झुंज | पुढारी

Himachal Pradesh Exit Poll : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला संधी? भाजपसोबत कडवी झुंज

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मंगळवारी (दि. ८ डिसेंबर) या निवडणुकीचे निकाल हाती येईल. त्यामुळे अवघ्या ३ दिवसांनी हिमाचल प्रदेशमध्ये कोणता पक्ष बहुमत घेईल हे लवकरच स्पष्ट होईल. या निकालापूर्वी सर्वांच्या नजरा सोमवारी (दि. ५) आलेल्या एक्झिट पोलकडे लागले होते. सर्वात आधी इंडिया टीव्हीचा एक्झिट पोल हाती आला आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होणार असे दिसून येत आहे.

एक्झिट पोलमध्ये भाजपने हिमाचलमध्ये 6 जागा गमावल्या

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हिमाचलमध्ये भाजपला 6 जागा कमी पडत आहेत. भाजप 44 वरून 38 जागांवर घसरली आहे. मात्र हिमाचलमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार हिमाचलमध्ये काँग्रेसला ४४ टक्के मतं मिळाली आहेत. तर भाजपला ४२ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे या एक्झिट पोलनुसार हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

इंडिया टीव्हीच्या : हिमाचलमध्ये आपचे खाते उघडणार नाही

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पार्टीला हिमाचलमध्ये एकही जागा मिळणार नाही असा अंदाज वर्तविला आहे. भाजपला 35-40 जागा मिळतील, तर काँग्रेसला 26-31 जागा मिळू शकतात. या पोलनुसार भाजप आघाडीवर राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.

टाईम्स नाऊ नवभारत : हिमाचलमध्ये पुन्हा भाजप

हिमाचल विधानसभा निवडणुकीत टाईम्स नाऊ नवभारतचा एक्झिट पोल समोर आला आहे. एक्झिट पोलनुसार हिमाचलमध्ये भाजपला फटका बसेल, पण अखेर भाजप सरकार स्थापन करू शकेल. या एक्झिट पोलनुसार 34-42 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला 24 ते 32 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. आम आदमी पक्षाला एकही जागा जिंकता येणार नाहीत. तसेच इतर पक्षांना एक ते तीन जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे.

न्यूज 18 : भाजप आघाडीवर

न्यूज 18 च्या एक्झिट पोलनुसार भाजप आघाडीवर राहील. भाजपाला 36 जागा, कांग्रेसला  30 , अन्य   2 असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तविलेला आहे. त्याचबरोबर आपला एकही जागा नाही.

हेही वाचा

Back to top button