

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे बलात्काराच्या प्रकरणात दोषी असलेल्या नराधमाची शिक्षा पूर्ण होण्याच्यी तीन वर्षे अगोदर सुटका करण्यात आली होती. सुटका झाल्यानंतर दीड वर्षांनी नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेल्या या व्यक्तीने ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. ही घटना मध्यप्रदेशच्या सतान जिल्ह्यात घडली आहे. राकेश वर्मा (रा. कृष्णानगर) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ५ वर्षीय पीडितेची प्रकृती नाजूक असून तिला उपचारांसाठी रिवा येथे हालवण्यात आले आहे.(Madhya Pradesh)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी राकेश शर्माने १२ वर्षांपूर्वी ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे त्याला केवळ ७ वर्षांच्या शिक्षेनंतर सुटका करण्यात आली. दीड वर्षांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला होता. दरम्यान, आता त्याने पुन्हा एकदा तसेच कृत्य केले आहे.(Madhya Pradesh)
आरोपीने अल्पवयीन मुलीला फसवून संध्याकाळी ५ वाजता सोबत नेले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर आणि पीडितेचा शोध सुरु केल्यानंतर आरोपीच्या गैरकृत्य केल्याची माहिती मिळाली. पीडित चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीवर पोलिसांनी विविध कलमांन्वयने गुन्हे दाखल केले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. (Madhya Pradesh)