

केस मानवी देहाच्या सौंदर्याचे प्रतिक आहे. सौंदर्य खुलण्यासाठी मोठे, दाट आणि मुलायम केस असणे गरजेचे आहे. यासाठी आजच्या घडीला केसांची निगा राखण्यासाठी विविध उत्पादने वापरली जातात. त्यात शॅम्पूचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या शॅम्पूमधील pH लेव्हल म्हणजेच अॅसिडिटी किंवा अल्कलाइन पातळी तुमच्या केसांच्या आणि टाळूच्या आरोग्यावर थेट परिणाम करते?
फक्त ब्रँड किंवा सुगंध बघून शॅम्पू निवडू नका. शॅम्पूचा pH लेव्हल हा तुमच्या केसांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. योग्य शॅम्पूची निवड म्हणजे केसांवरील गुंतागुंत टाळण्याचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन pH लेव्हल कमी असलेला शॅम्पूचा तुम्ही दैनंदिन जीवनात वापरू शकतो. ज्यामुळे केसाचे आरोग्य सांभाळले जाईल.
आपल्या टाळूचा नैसर्गिक pH सुमारे 4.5 ते 5.5 दरम्यान असतो, जो किंचित अॅसिडिक असतो. याचमुळे टाळूवर हानिकारक बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन वाढत नाही. पण बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक शॅम्पूमध्ये pH लेव्हल 7 पेक्षा जास्त असतो, जो अल्कलाइन प्रकारात मोडतो. अशा शॅम्पूचा नियमित वापर केल्यास टाळूवरील नैसर्गिक अॅसिडिक स्तर नष्ट होतो, केस कोरडे, तुटणारे आणि निर्जीव होण्याची शक्यता वाढते.
रोजच्या वापरासाठी निवडलेला शॅम्पू सॉफ्ट, सल्फेट-मुक्त आणि pH-बॅलन्स्ड असावा. अशा शॅम्पूमध्ये pH ५.५ च्या आसपास असतो, जो आपल्या टाळूच्या नैसर्गिक पातळीशी सुसंगत असतो. यामुळे टाळूची ओलावती, तेलस्राव, आणि केसांच्या मुळांचे आरोग्य टिकून राहते.
बाजारात काही शॅम्पूच्या लेबलबद्दल 'pH balanced' असा उल्लेख असतो. पण शक्य असल्यास pH test strips वापरून घरातच शॅम्पूचा pH तपासता येतो. यामुळे आपण वापरत असलेला शाम्पू योग्य आहे की नाही, हे तपासून पाहता येते.
तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनात pH balanced शॅम्पूचा नियमित वापर केल्यास केस गळती कमी होते. तसेच डँड्रफ टाळता येतो, केसांमध्ये नैसर्गिक चमक येते आणि केसांची ग्रोथ सुधारते. यामुळे केस हेल्दी आणि चमकदार देखील होतील. यासाठी कोणत्या बाहेरील प्रोडक्ट वापरण्याची गरजही तुम्हाला भासणार नाही.
pH (Potential of Hydrogen) ही एक स्केल आहे जी द्रव्याचे अॅसिडिक किंवा अल्कलाइन (म्हणजे क्षारीय) स्वरूप दर्शवते. याचे स्केल 0 ते 14 पर्यंत असते.
7 = Neutral
0 ते 6.9 = Acidic
7.1 ते 14 = Alkaline
आपल्या टाळूचा नैसर्गिक pH: 4.5 ते 5.5 यामुळे टाळूवर फायदेशीर बॅक्टेरिया टिकतात आणि केसांच्या क्यूटिकल्स सुरक्षित राहतात.
शॅम्पूवर ‘pH Balanced’, ‘Mild Cleanser’ किंवा ‘Sulfate-Free’ असा उल्लेख आहे का हे पाहा.
शक्य असल्यास baby shampoo वापरावा – याचा pH 5.5 असतो.
गरज असेल तेव्हाच शॅम्पू वापरा, दररोज केस धुण्याची आवश्यकता नाही.