साऊथ स्टार महेश बाबूच्या प्रेमात पडली होती ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

साऊथ स्टार महेश बाबूच्या प्रेमात पडली होती ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : साऊथ स्टार महेश बाबू याच्या प्रेमात एक मराठमोळी अभिनेत्री पडली होती. साऊथ स्टार महेश बाबू या अभिनेत्याचा ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्याचा जन्म चेन्नई (तामिळनाडू) मध्ये झाला. महेशने चेन्नईतील सेंट बेडे अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूलमधून शिक्षण घेतले होते.

अधिक वाचा – 

महेशने चेन्नईतील लोयोला कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली.यानंतर त्‍याने विशाखापट्टणममध्ये दिग्दर्शक एल सत्यानंद यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. तेथे त्याला तेलुगु वाचण्यात आणि लिहिण्यात अडचणी यायच्या. त्याने स्वत: २०१५ मध्ये चित्रपट श्रीमंथुन्डूच्या प्रमोशनवेळी सांगितलं होतं की, चेन्नईमध्ये त्याचं बालपण गेलं आहे. त्याला तेलुगु लिहिता-वाचता येत नव्हतं. पण, तेलुगु चांगल्या प्रकारे बोलू शकतो.

अधिक वाचा –

महेशसोबत याच शाळेत तमिळ अभिनेता कार्थी आणि सूर्याचा भाऊदेखील शिक्षण घेत होता. बालकलाकार म्हणून महेशने करिअरची सुरुवात केली होती. मुख्य अभिनेता म्हणून त्याने 'राजाकुमाडु' चित्रपटामध्ये (१९९९) काम केलं होतं.

अधिक वाचा- 

महेश चित्रपटांशिवाय त्याची पत्नी, बॉलीवूडची सुंदर अदाकारा, मराठममोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरमुळे चर्चेत राहतो. महेश-नम्रता यांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नाही.

त्याने २००० मध्ये चित्रपट 'वामसी'मधू नम्रता शिरोडकरसोबत काम केले होते. चित्रपटाचे शूटिंग संपेपर्यंत दोघांना एकमेकांशी प्रेम झाले. जवळपास ४ वर्षांनंतर एकमेकांना डेट केल्यानंतर नम्रता आणि महेश बाबूने १० फेब्रुवारी, २००५ रोजी लग्न गाठ बांधली.

२००६ मध्ये महेश बाबू आणि नम्रताने मुलाला (गौतम) आणि २० जुलैला, २०१२ रोजी मुलगी (सितारा) ला जन्म दिला. विशेष म्हणजे, नम्रता ही महेशपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.

महेशकडे २२२ कोटी रुपयांची संपत्ती

महेशकडे २२२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये एक ३० कोटींचा आलीशान बंगला आहे.

त्याने बंगळुरूमध्ये एक घर खरेदी केलं आहे. त्याची किंमत कोटींमध्ये आहे. त्याला लक्झरी कार आवडतात.

रेंज रोवर, मर्सिडीज बेंज आणि ऑडी यासारख्या महागड्या कारचे कलेक्शन त्याच्याकडे आहेत. लॅम्बॉर्गिनी गॅलार्डोदेखील त्याच्याकडे आहे. त्याची किंमत ३ कोटी आहे.

याशिवाय २ कोटींची रेंज रोवर वोग, ९० लाखांची टोयोटा लँड क्रूजर, ४९ लाखांची मर्सडीज बेंज ई क्लास आणि १.१२ कोटींची ऑडी ए८ देखील आहे.

महेशचा समावेश सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्यांमध्ये होतो. तो एका चित्रपटासाठी १८ ते २० कोटी रुपये घेतो. आतापर्यंत त्याने ३९ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनय आणि हिट चित्रपटांनी त्याने हिंदी प्रेक्षकांमध्ये आपली खास ओळख बनवली आहे.

त्याने मुरारी (२००१), बॉबी (२००२), ओक्काडू (२००३), अर्जुन (२००४), पोकिरी (२००६), बिझनेसमॅन (२०१२), आगदु (२०१४), ब्रह्मोत्सवम (२०१६), स्पायडर, भारत अने नेनु, महर्षि, सरिलेरू नीकेवरूसहित अनेक हिट चित्रपट  दिले आहे.

हे देखील वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news