नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजधानी दिल्लीत प्रथमच सप्टेंबर महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात २००९ नंतरच विक्रमी पावसाची नोंद झाली हाेती. मंगळवारपासून सुरु आलेल्या पावसामुळे दिल्ली, नोएडा सह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अनेक भागात पाणी जमा झाल्याने वाहतूक संथगतीने सुरू असल्याचे दिसून आले.
बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने यापूर्वीच ऑरेंट अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार दिवसांपर्यंत दिल्लीत मध्यम स्वरूपाचा पाउस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्या, २ सप्टेंबर तसेच ३ सप्टेंबरला राज्यात सौम्य पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक खोळंबल्याचे चित्र दिसून आले. विविध ठिकाणी वाहतूक मंदगतीने सुरू आहे.
मुनिरका परिसरात ओव्हर ब्रीजच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे.
परिसरातील नागरिकांना विशेष अडचणींचा त्यामुळे सामना करावा लागत आहे.
बुधवारी सकाळपासूनच काळे ढग दाटून आल्यामुळे सर्वत्र अंधार दिसून आला.
हवामान खात्यानुसार दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरुग्राम, मानेसर, फरिदाबाद, बल्लभगढ तसेच तोशाम,भिवानी, झज्जर, नारनौल, महेंद्रगढ, कोसलीसह विविध ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाउस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी दिल्लीत विक्रमी पावसाची नोंद घेण्यात आली.
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात २००९ नंतरच एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे.
१० सप्टेंबर २००९ रोजी दिल्लीत ९८.८ एमएम पावसाची नोंद करण्यात आली होती.
गेल्या २४ तासांमध्ये सफदरजंग मध्ये ११२.१ एमएम, लोधी रोड १२०.२ एमए, पालम ७१.१ एमएम तसेच आयानगरमध्ये ६८.२ एमएम पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हेही वाचलं का ?