राष्ट्रवादी vs समीर वानखेडे : नवाब मलिक म्हणाले जेलमध्ये टाकणार, आता समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी vs समीर वानखेडे : नवाब मलिक म्हणाले जेलमध्ये टाकणार, आता समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) केलेली कारवाई आणि त्यानंतर शाहरुख खानच्या पोराला झालेली अटक यानंतर राष्ट्रवादी vs समीर वानखेडे वाद आता गंभीर वळणावर जाऊन पोहोचला आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कडाडून प्रहार गेल्या काही दिवसांपासून केला आहे. ते भाजपचे हस्तक असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. आज नवाब मलिक यांनी वर्षभरात समीर वानखेडे यांना जेलमध्ये टाकणार असे म्हटले आहे. त्यांनी जाहीर सभेतच यांनी आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादी vs समीर वानखेडे

नवाब मलिक यांनी दिलेल्या आव्हानानंतर समीर वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नवाब मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ते उघडपणे धमकी देत आहेत, पण मी देशाची सेवा करत आहे. त्यांनी केलेली विधाने गंभीर असल्याचे ते म्हणाले.

समीर वानखेडे यांनी आपण कधी दुबईला गेलो याची माहिती नवाब मलिकांनी अशी विनंती केली. मालदीवच्या ट्रिपवरून त्यांनी मी जाणे गुन्हा आहे का? अशी विचारणा केली. मी माझ्या कुटुंबात सोबत गेल्याने तुरुंगात टाकणार का? असेही ते म्हणाले.

नवाब मलिक नेमके काय म्हणाले?

मंत्री नवाब मलिक यांनी मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप कडाडून हल्ला चढवला. समीर वानखेडे वर्षात तुरुंगात जाईल. त्यांची वर्षात नोकरी जाणार असून तुरुंगवास निश्चित आहे. नवाब मलिक यांनी यावेळी एकेरी भाषेचा उल्लेख करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे सुद्धा नाव घेतले.

त्यांनी माझ्याकडे फोन करून सांगितले की, हे दबावापोटी केलं आहे. तर मग कोणाच्या सांगण्यावरून करत आहे? बाप कोण आहे याचे उत्तर दे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

हे ही वाचलं का?

logo
Pudhari News
pudhari.news