आणि न्यूज चॅनेलवर बातम्या सोडून सुरू झाला थेट पॉर्न व्हिडिओ - पुढारी

आणि न्यूज चॅनेलवर बातम्या सोडून सुरू झाला थेट पॉर्न व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेच्या वाशिंग्टनमध्ये हवामानाचा अंदाज पाहत असणाऱ्या प्रेक्षकांना मध्येच एक झटका बसला. एका स्थानिक बातमी देणाऱ्या चॅनेलवर अचानक पॉर्न व्हिडिओ क्लिप प्रसारित झाली. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ सुरु झाला. केआरईएम, वॉशिंग्टनमधील स्पोकेन स्थित स्थानिक सीबीएस संबंधित न्यूज आउटलेटने अचानक संध्याकाळी ६ वाजता न्यूजकास्ट दरम्यान १३ सेकंदांचा व्हिडिओ प्रसारित केला.

हवामान तज्ञ मिशेल बॉस हवामानाचे अपडेट देत होती. त्याचवेळी त्यांच्या मागिल स्क्रिनवर एक अश्लिल व्हिडिओ सुरु झाला. या व्हिडिओबद्दल त्या अँकरला किंवा त्यांच्या सह-अँकरलाही याची कल्पना नव्हती. त्या दोघींनी त्यांचा हवामान अहवाल सुरुच ठेवला. कारण ग्राफिक व्हिडिओ बॅकग्राउंडमध्ये सुरु होण्यापूर्वी हवामान फुटेजमध्ये कट करत असल्याने त्या दोघींनी त्यांचे अहवाल सुरु ठेवले.
एका अहवालानूसार, केआरईएम या चॅनेलने आपल्या रात्री ११ वाजताच्या प्रसारणावेळी पॉर्न व्हिडिओसाठी माफी मागितली.

त्यांनी सांगितले केआरईएम २ मध्ये आज रात्री ६ वाजता आमच्या न्यूजकास्टमध्ये जे काही झाले त्यासाठी आम्ही सर्वजण तुमची माफी मागतो. शो च्या अगोदर एक पॉर्न व्हिडिओ प्रसारीत झाला. हे पुन्हा होणार नाही याची खात्री आम्ही घेतो.यासाठी आम्ही परिश्रमपूर्वक काम करत आहोत ”. असही त्यांनी यात सांगितले आहे.

केआरईएम च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चॅनेलने चुकुन एक पॉर्न व्हिडिओ प्रसारीत केला. यासाठी माफी मागितली आहे. TEGNA चे मुख्य अधिकारी ऐनी बेंटल यांनी म्हटल की, आम्ही काल रात्री ११ वाजता न्यूजकास्टमध्ये आमच्या प्रेक्षकांची माफी मागितली.
प्रेक्षकांचे अनेक कॉल आल्यानंतर स्पोकेन आणि पोलिस या घटनेची चौकशी करत आहे.

२०१७ मध्ये अशीच एक घटना उघडकीस आली होती. एका मोठ्या न्यूज चॅनेलमध्ये एक कर्मचारी अश्लिल व्हिडिओ क्लिप पाहत असल्याचा एका दर्शकाला दिसला होता. एका लाईव्ह प्रसारणा दरम्यान बातमी सांगणाऱ्या अँकरच्या पाठिमागे एक कर्मचारी अश्लिल व्हिडिओ पाहत असल्याच समोर आलं होत.

हेही वाचलत का?

Back to top button