राजन गवस यांच्या मुलांच्या नावे व्हॉट्स अॅप उघडून फसवणूक करणाऱ्यास अटक

राजन गवस यांच्या मुलांच्या नावे व्हॉट्स अॅप उघडून फसवणूक करणाऱ्यास अटक
Published on
Updated on

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : गारगोटीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांचा मुलगा व मुलीच्या नावे बनावट व्हॉट्स अॅप अकाऊंट उघडून अनेक मुलींना त्रास देणार्‍या भामट्यावर भुदरगड पोलिसांनी बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यास अटक केली आहे. संग्राम यशवंत देसाई (रा. अंतुर्ली, ता. भुदरगड) असे त्यांचे नाव आहे. आपण डॉ. राजन गवस यांच्या घरी राहत असल्याचा कांगावा तो करत होता.

संग्राम देसाई या युवकाने डॉ. राजन गवस यांच्या मुलगा व मुलीच्या मोबाइल क्रमांकावरून (9322617599) बनावट व्हॉट्स अॅप अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर त्याने डॉ. गवस यांच्या कुटुंबियांचा फोटो लावला. या अकाऊंटवरून तो गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अनेक मुलींशी, मुलांशी चॅटिंग करीत होता.

आपण डॉ. गवस यांच्या घरी राहत असून पुस्तक लिहित असल्याचा कांगावा तो करत होता. तसेच पुण्यामध्ये डॉ. गवस यांच्या मुलीच ऑफीस असून या ठिकाणी पुस्तक प्रकाशीत केली जातात.

या ऑफिसमध्ये जॉब असल्याचे तो मुलींना सांगून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होता.

दोन मुलींना त्याने बँकेचे धनादेशदेखील दिले आहेत. मुलींशी चॅटिंग करताना डॉ. गवस यांची मुलगी चॅटिंग करते असे, तो भासवत होता. मोबाईलवर तो स्वत: बोलत नव्हता. फक्त चॅटिंग करत होता. त्यामुळे मुलींना ही गोष्ट लक्षात येत नव्हती.

गेल्या महिन्यात एका चाणाक्ष युवतीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने डॉ. गवस यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर डॉ. गवस यांनी 24 जुन रोजी भुदरगड पोलिसात तक्रार दाखल केली.

महिना होत आला तरी पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणाची मीडियात जोरदार चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी संग्राम देसाई यास अटक केली आहे. त्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news