मुंबई : शीतल म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शितल म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
शितल म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबई शिवसेनेच्या दहिसर भागातील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. म्हात्रे यांनी काल एकनाथ शिंदे गटात  प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत वेगळा शिंदे गट निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या या बंडात कल्याण डोंबिवली सह उल्हासनगर आणि ठाण्यातील नगरसेवक सामील झाले होते. मुंबईमधून मात्र आतापर्यंत कोणताही नगरसेवक किंवा माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाला नव्हता. शिवसेना मुंबईतून शिंदे गटात जाणाऱ्या त्या पहिल्याच नगरसेविका ठरल्या आहेत.

म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटावर मोठी टीका केली होती. शिंदे गटाला धडा शिकवायला हवा अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

हे ही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news