महाराष्ट्राची एवढी बेअब्रू झाली नव्हती, मुख्यमंत्री गप्प का? : संजय राऊत

शिवशक्‍ती-भीम शक्‍ती
शिवशक्‍ती-भीम शक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचं सरकार हतबल झालं आहे का? मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस कुणाला घाबरत आहेत? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. कर्नाटक महाराष्ट्राचा रोज अपमान करतं. महाराष्ट्राची एवढी बेअब्रू झाली नव्हती. यावर मुख्यमंत्री गप्प का? मुख्यमंत्र्यांना कोणाची भीती वाटतेय, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर बोलत नाहीत. शहांसोबत बैठकीनंतरदेखील बोम्मई बरळत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टानेच हटवले पाहिजे.

काय म्हणाले होते बोम्मई?

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सुरु असलेला सीमाप्रश्नाचा वाद मोठा चर्चिला जात आहे. याबाबत कर्नाटक विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार असल्याची माहितीही कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली होती. 'महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असा पुनरुच्चार करत विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई बरळले होते. सीमावादाच्या मुद्द्यावर विधिमंडळाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आहे. जर सर्वांनी सहमती दर्शविली तर आम्ही सीमाप्रश्नावरील चर्चेवर सरकारला उत्तर देताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याच्या भूमिका स्पष्ट करणारा ठराव मंजूर करू.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news