बेन स्टोक्स म्हणाला, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यावर नियंत्रण मिळवू

बेन स्टोक्स म्हणाला, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यावर नियंत्रण मिळवू
Published on
Updated on

अ‍ॅडलेड, वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरुद्ध होणार्‍या सेमीफायनल सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने मंगळवारी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने विराट कोहली व टी-20 मधील सध्याचा नंबर वन खेळाडू सूर्यकुमारची मुक्तकंठाने प्रसंशा केली. मात्र, इंग्लिश गोलंदाज सध्या फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार व विराटवर नियंत्रण मिळवतील, असा विश्वासही व्यक्त केला.

तसे पाहिल्यास बेन स्टोक्सला टी-20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शानदार खेळ दाखविण्यास अपयशी ठरला आहे. मात्र, हा खेळाडू मेन इन ब्ल्यूविरुद्ध शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. सूर्यकुमारबद्दल बोलताना स्टोक्सने सांगितले की, तो एक अत्यंत चांगला खेळाडू असून तो अफलातून फटके मारतो, त्याच्याबद्दल आम्हाला निश्चितपणे विचार करावा लागेल.

या खेळाडूने आपल्या कामगिरीने क्रिकेटमध्ये चमक दाखविली आहे. त्याचे फटके पाहून प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे विचार करावा लागतो. मात्र, आम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवू आणि त्याला मोकळेपणाने फलंदाजी करू देऊ शकणार नाही, असे मला वाटते. कोहलीबद्दल स्टोक्सने सांगितले की, तिन्ही प्रारूपातील आकडेवारी व खेळी पाहता विराटशिवाय अशी कामगिरी दुसरा कोणी करूच शकत नाही, असे वाटते.

वर्ल्डकपमध्ये अद्याप आपल्या क्षमतेनुसार खेळ करण्यास अपयश आल्याचे मान्य करून बेन स्टोक्स याने सांगितले की, भारतासारख्या भक्कम संघाविरुद्ध खेळताना असे होणार नाही. मी चांगली कामगिरी करण्याचा निश्चिपतणे प्रयत्न करेन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news