राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : मुख्याध्यापकाने दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडाला. हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाला असून समाजात बदनामी होण्याच्या भीतीने पालकांनी पोलिसांत जाणे टाळले आहे.असे असले तरी विद्यालय चालविणाऱ्या संस्थेचे अध्यक्षांनी पोलिसांत मुख्याध्यापकाविरोधात लेखी तक्रार दिली आहे.त्यांनी या विनयभंग प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गाव परिसरात या बातमीने खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा :
कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरूअसून शिक्षक नियमितपणे उपस्थित असतात.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संबंधित मुलगी आठवीत शिकणाऱ्या आपल्या भावाची नेलेली पुस्तके परत करण्यासाठी आली होती.त्या वेळी पीडितेला मुख्याध्यापकाने आपल्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर विद्यार्थिनीशी लज्जा उत्पन्न होणारा प्रकार केला.मुलीने घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोन दिवसांनी पालकांनी महिला शिक्षकांना मोबाईल वरून हा प्रकार सांगितला.
अधिक वाचा :
या विनयभंग प्रकाराची चर्चा सुरू झाल्यावर मुख्याध्यापकाने संबंधित शिक्षण संस्था सचिवांकडे रजेचा अर्ज देऊन भीतीपोटी घरी बसणे पसंत केले.
पालकांनी बदनामी होईल म्हणून संस्थेकडे तक्रार करण्यापलीकडे कुठेही वाच्यता केली नाही. संस्थाचालकांनी मुख्याध्यापकाशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न केले. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. १० जुलैला खेड पोलीस ठाण्यात पत्र दिले.त्याच्यावर चौकशी सुरू असल्याचे सांगितले गेले. मुख्याध्यापक विविध अर्थाने पोहचलेला असून सगळी सेटिंग लावली असल्याचे बोलले जात आहे.
विनयभंग होऊन आणि एका संस्थेच्या माध्यमातून तक्रार होऊन देखील कारवाईत दिरंगाई झाल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.
पालकांना तक्रार देण्यासाठी विनंती केली असता त्यांनी ती अमान्य केली. हा प्रकार माहिती असलेल्या शिक्षिका या नातेवाईक मयत झाल्याने बाहेरगावी आहेत. त्या मंगळवारी (दि २०) येतील त्यानंतर तक्रार नोंदवली जाण्यासाठी प्रयत्न होतील, असे सांगितले जात आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : धबधब्यावर अडकले ११८ पर्यटक
https://youtu.be/6QTCiJ2brJI