बोईसर : चालत्या वॅगनर कारने घेतला पेट, गाडी जळून खाक

बोईसर : चालत्या वॅगनर कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Published on
Updated on

बोईसर; पुढारी वृत्तसेवा : बोईसर – चिल्हार या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या नागझरी – नानिवली मार्गावर चालत्या वॅगनर कारने अचानक पेट घेतला. चार मंदिराजवळ वॅगनर कारने जळून खाक झाली. गाडीत कारच्या मालकासह त्याची पत्नी आणि वडील होते. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

लेबर कॉन्ट्रॅक्टर असलेले किराट येथील भावेश मोहन पावडे बोईसरकडे जात होते. लालोंडे येथिल चार मंदिराच्या पुढे गेल्यानंतर गाडीतून धूर येऊ लागला. गाडीने अचानक पेट घेतला.

प्रसंगावधान राखत भावेश पावडे आणि त्यांचे कुटुंब गाडीतून उतरले. नंतर गाडीने जास्तच पेट घेतला. गाडी रस्त्याच्या मधोमध जळाल्याने अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news