नाशिक : चालत्या रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालक व प्रवासी महिला ठार

नाशिक : चालत्या रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालक व प्रवासी महिला ठार

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबक रोडवरील आय. टी. आय सिग्नल जवळ चालत्या रिक्षावर गुलमोहराचे वृक्ष उन्मळून पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली व रिक्षात अडकलेल्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेत रिक्षाचालक पोपट सोनवणे व एक प्रवासी महिला शैला पटणी या दोघांचा मृत्यू झाला आहे.  ही रिक्षा शहरातून सातपूरकडे निघाली होती. चालत्या रिक्षेवर अचानक झाड पडल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. मान्सूनपूर्व काम पूर्ण न केल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून शहरातील धोकादायक झाड तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली
घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news