बोईसर; पुढारी वृत्तसेवा : तारापूर औद्योगिक वसाहत : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखारिया लिमिटेड या टेक्सटाईल कंपनीत शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे.
मृत कामगारांची नावे मिथिलेश राजवंशी आणि छोटे लाल सरोज अशी आहेत. जखमी जखमी कामगारांची नावे गणेश विजय पाटील, अरविंद यादव, मुरली गौतम, अमित यादव, मुकेश यादव आणि उमेश राजवंशी अशी आहेत.
स्फोटात कारखान्यातील दोन कामगारांचा मुत्यू झाला असून सहा कामगार जखमी झाले आहेत. कारखान्यातील बॉयलरमुळे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटामुळे कारखान्याला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखरिया टेक्स्टाईल या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटामुळे कारखान्याला आग लागली आहे. कारखान्यात आठ कामगार काम करीत होते.
स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराचा मृतदेह कारखान्यात आढळून आला, तर छोटेलाल सरोज नामक कामगार बेपत्ता आहे. सहा कामगार जखमी झाले आहेत, त्यांच्यावर बोईसर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.कारखान्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.स्फोटाच्या आवाजाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला आहे.
हे ही वाचलं का?