ठाणे : पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला; अग्‍निशमन दलाचे जवान घटनास्‍थळी दाखल

ठाणे : पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला; अग्‍निशमन दलाचे जवान घटनास्‍थळी दाखल

नेवाळी (ठाणे) ; पुढारी वृत्तसेवा  शीळ रोड – ठाणे महापालिका हद्दीतील कल्याण शीळ रोडवरील कल्याण फाटा येथे एका पाच मजली इमारतीचा काही भाग (शुक्रवार)रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या इमारतीत १५ कुटुंब रहात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली, तर यामध्ये २ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. याबाबत ठाणे महापालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान या परिसरात जवळच असलेल्या लकी कंपाऊड मध्ये काही वर्षांपूर्वी इमारत पडून काही लोकांचा मृत्यू झाला होता. तरीही दिवा, शीळ, पडले या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असून ठाणे महापालिका याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेला वारंवार कळवून सुद्धा शीळ आणि दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामा बाबत तक्रार करून सुद्धा पालिका याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे लकी कंपाउंडची घटना या परिसरात पुन्हा होऊ नये याकडे नवीन स्थापित झालेल्या शिवसेना व भाजपा सरकारने गंभीरपणे लक्ष द्यावे असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news