Delhi : नारकोटिक्स विभागाकडून प्रसिद्ध भोजपुरी गायकाला 21 किलो गांजासह अटक | पुढारी

Delhi : नारकोटिक्स विभागाकडून प्रसिद्ध भोजपुरी गायकाला 21 किलो गांजासह अटक

पुढारी ऑनलाइन डेस्क : नवी दिल्ली : पश्चिम जिल्ह्यातील नारकोटिक्स विभागाकडून प्रसिद्ध भोजपुरी गायकाला 21 किलो गांजासह अटक केली. आरोपी प्रसिद्ध भोजपुरी गायक असून त्याने 100 पेक्षा जास्त गाने गायले आहे. पोलिसांनी एनसी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत इंद्रपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने गांजा कोठून मिळवला होता आणि कोणाला विकणार होता याचा तपास पोलीस करत आहे.

विनय शर्मा (वय 31, रा. सावन बिहार), असे प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि आरोपीचे नाव आहे. आरोपीला टोडापूर येथून अटक करण्यात आली. ही कारवाई 10 ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

पश्चिमी दिल्लीचे डीसीपी घनश्याम बंसल के मुताबिक 10 ऑगस्टला नारकोटिक्स स्क्वॉडच्या टीमला एक विशेष सूचना मिळाली होती की एक ड्रग पेडलर विनय शर्मा टाडापूर गाव, इंद्रपुरी येथे एकाला भेटायला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम ने टोडापूर जवळ जाळे पसरवले आणि साडेदहा वाजता एका संशयित इसमाला पाहिले.

संशयावरून पोलिसांनी त्याला घेरले आणि त्याने त्याची ओळख विनय शर्मा (वय 31, रा. सावन बिहार) अशी सांगितली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पोलिसांना 21 किलो गांजा आढळला. पोलिसांनी हा गांजा जप्त करत विनयला अटक केली. पुढे तपासात विनय एक प्रसिद्ध भोजपुरी गायक आहे, त्याने 100 पेक्षा अधिक गाने गायले आहे, असे आढळले.

भोजपुरी गायक विनय आणि ड्रग्स तस्कराला पकडण्याच्या या कारवाईत नारकोटिक्स स्क्वॉडची टीम एसआई संदीप, एएसआई करण सिंह आणि त्यांच्या टीमने महत्वाची भूमिका बजावली. कारवाईत हेड कॉन्स्टेबल विजय सिंह आणि लेखराज यांनी सहभाग घेतला. पुढील तपास नारकोटिक्स विभाग दिल्ली करत आहे.

ड्रग्ज तस्करी : बॉलिवूड अभिनेत्याचा मेहुणा तिसर्‍यांदा जाळ्यात, मुंबई कनेक्शन

‘ते’ देत होते पेस्ट्री केकमधून ड्रग्ज; मुंबईत NCBचा छापा 

Back to top button