नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्ली दंगलीचा प्रमुख सूत्रधार उमर खालिद याला जामीन देण्यास दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेला खालिद हा दंगलीचा मास्टरमाईंड मानला जातो. त्याच्याविरोधात दंगलीचा कट रचण्यासह गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत.
आपल्यावर करण्यात आलेले आरोप सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षाकडे पुरेसे पुरावे नसल्याचा युक्तिवाद उमर खालिदच्या वकिलांनी केला होता. दुसरीकडे पोलिसांकडून खालिदविरोधात अतिशय गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती अमिताभ रावत यांनी खालिदची याचिका फेटाळून लावली.
सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करण्याच्या निमित्ताने दंगल घडवून आणण्यासाठी खालिदने दिल्लीसह देशाच्या विविध भागात प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप पोलिसांचा आरोप आहे. दिल्लीत झालेल्या भीषण दंगलीत 53 लोक मृत्यूमुखी पडले होते तर सातशेपेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
हे ही वाचलं का ?