जळगाव : आयशरची मॅक्झीमोला धडक, धानोऱ्याजवळील अपघातात ५ गंभीर

जळगाव : आयशरची मॅक्झीमोला धडक, धानोऱ्याजवळील अपघातात ५ गंभीर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

चोपडा तालुक्यातील धानोरा ते देवगाव दरम्यान आयसर व मॅक्झीमो गाडी यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात ९ जखमी तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले.

याबाबत सविस्तर असे की (एम.एच.६३ सी.४७४७) ही आयशर चोपडाहून जळगावकडे जात असतांना धानोरा गावजवळ जितेंद्र महाजन यांच्या शेताजवळ जळगावकडून चोपडाकडे प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झीमो क्रमांक (एम.एच‌.१९ बी.यु.४९७७) या गाड्यांमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार धडक झाली. यात नऊ जण जखमी झाले आहेत तर पाच जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे.

जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार…

या अपघातात शोभा विनोद आढाळे (वय ३०, रा. पिंप्राळा) श्रीराम रुपसिंग (वय ४५), बन्सीलाल सुरसिंग (वय ३५), घनश्याम आढळकर (वय ३८, सर्व रा. धानोरा ता. चोपडा), नितीन सोनवणे (वय ३८), मनोज गवळी (वय ३५, रा. शनिपेठ) आदी जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news