गोव्यातील फुटबॉलपटूचा अमेरिकेत खून, आईचा एकमेव आधार हरपला

गोव्यातील फुटबॉलपटूचा अमेरिकेत खून, आईचा एकमेव आधार हरपला
Published on
Updated on

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : मूळ कुलचाभाट कावरी चांदोर येथील जॉन डायस या 27 वर्षीय युवकाचा, टेक्सास प्रांतमधील ह्युस्टन येथील व्ही स्टॉप फूड मार्टामध्ये गोळी झाडून खून करण्यात आला. हा खून रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला.

एक लोकप्रिय फुटबॉलपटू असलेला जॉन वर्षभरापूर्वी टेक्सास येथे नोकरीच्या निमित्ताने गेला होता. तो काम करत असलेल्या दुकानात त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. त्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जॉन हा चांदोर आणि गिर्दोली क्लबसाठी खेळत होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई असा परिवार आहे. चांदोर चर्चच्या समोर एका घरात भाडेपट्टीवर ती राहात आहे. जॉन हा पूर्वी जहाजावर कामावर होता. वर्षभरापूर्वी त्याला ह्युस्टन येथील दुकानात क्लार्क कम कॅशियरची नोकरी मिळाली होती. आईचा एकमेव आधार असलेल्या जॉनच्या खुनामुळे त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चोरीच्या प्रयत्नातून हा हल्ला झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. जॉन हा कॅश काउंटरवर असताना बुरखा घालून आलेल्या व्यक्तीने त्याच्या डोक्यात गोळी झाडल्याचे दिसत आहे. त्याच्या या मृत्यूविषयी चांदर भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घर बांधण्याचे स्वप्न अधुरेच

जॉन डायस यांचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. जॉनचे बालपण भाड्याच्या घरात गेले होते. आखातात मिळालेल्या नोकरीच्या बळावर त्याने नुकतेच चांदर येथे एक जमीन खरेदी केली होती. गोव्यात येऊन घर बांधण्याचा त्याचा विचार होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news