मुंबई; पुढारी ऑनलाईन : गहना वशिष्ठ हिचा राज कुंद्रा प्रकरणाशी काय संबंध आहे? गहना वशिष्ठ हिचे स्टेटमेंट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर समोर आले आहे. कोर्ट ठरवेल की खरा गुन्हेगार कोण आहे, असे तिने म्हटले आहे.
अश्लिल चित्रपट बनवणे आणि त्यांचे काही अॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक वाचा –
सोमवारी चौकशी अंती ही कारवाई करण्यात आली आहे. मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघड़कीस आणले होते.
यानंतर गहना म्हणाली की, तिला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. कोर्ट ठरवेल की, खरा गुन्हेगार कोण आहे? याआधी या प्रकरणीच वशिष्ठलादेखील अटक झाली होती.
अधिक वाचा
वशिष्ठचा प्रवक्ता फ्लिन रेमेडियोसने स्टेटमेंट जारी केले आहे.
तिने स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. कायदा आपले काम करत आहे. आम्हाला मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते आपले चांगले कार्य करीत आहेत.
अधिक वाचा
शेवटी ट्रायल दरम्यान कोर्ट ठरवेल की, खरा गुन्हेगार कोण आहे आणि कोणत्या गुन्हेगारांचा वापर दुसऱ्यांकडून करण्यात आला होता.
गहनाने हादेखील इशारा दिला की, याप्रकरणी अद्याप अन्य लोकांची अटक होणे शिल्लक आहे. पण, यावर मी कुठलेही वक्तव्य करू शकत नाही. कारण, मी त्याचप्रकरणी जामीनावर आहे. पोलिसांना संपूर्ण तपास करायला हवा.
दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेनंतर अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
एका वेबसाईटशी बोलताना गहना म्हणाली, सध्या ती या प्रकरणा काही सांगू शकत नाही. कारण, तिची प्रकृती ठिक नाही. हे सांगताना ती रडूही लागली होती.
गहना वशिष्ठला पोर्न रॅकेट प्रकरणात जूनमध्ये जामीन मिळाला होता. ती उपचारासाठी बाहेर आली होती. जुलैच्या सुरुवातीला गहनाला हार्ट ॲटॅक आला होता.
त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. हार्ट ॲटॅक आल्यानंतर ती तीन दिवस व्हेंटिलेटरवर होती.
राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. रायन जॉन थार्प असं त्याचं नाव आहे. रायन थार्प विरुद्ध मालवणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा –
पाहा फोटोज – विठूराया न्हावून निघाले फुलांच्या रंगात!!
[visual_portfolio id="10374"]