खेड तालुक्याचा पश्चिम भागातील डोंगररांगेत फुलोत्सव (फोटो)

फोटो ओळ : खेड तालुक्याचे पश्चिम भागातील वेगवेगळ्या प्रजातीची रानफुले. (सर्व छायाचित्रे : आदेश भोजने)
फोटो ओळ : खेड तालुक्याचे पश्चिम भागातील वेगवेगळ्या प्रजातीची रानफुले. (सर्व छायाचित्रे : आदेश भोजने)

डोंगररांगेत फुलोत्सव : पश्चिम घाटातील सह्याद्री परिसरात किल्ले, तीर्थक्षेत्र, नद्यांचे उगम, गिरिस्थाने, अभयारण्य व जैवविविधता मोठ्या प्रमाणात असून ती जगभर प्रसिद्ध आहे. सह्याद्रीने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपला आहे. याच सह्याद्रीच्या पर्वतरांगा व पठारावर वर्षभर विविध फुले, पक्षी, प्राणी, कीटक, सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. श्रावण भाद्रपद महिन्यात जणू याची जत्राच भरते.

या निसर्गातील रंगबेरंगी रानफुले मन मोहून टाकत असून खेड तालुक्यातील प्रति कासपठार असलेल्या पश्चिम भागातील डोंगररांगा फुलांनी बरल्या आहेत.

सह्याद्रीच्या पठारातील हिरव्यागार गालिच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली वाऱ्याची झुळूक आणि डोलणारी विविधरंगी फुले मन मोहून टाकतात. खेड तालुक्यात विविध ठिकाणी फुलोत्सव पहायला मिळतो.

डोंगररांगेत फुलोत्सव : विविधरंगी फुले

सोनकीच्या पिवळ्या फुलांनी तर डोंगरदऱ्या सोनेरी होतात. नभेळी, पंद, कापरू, भुईचक्र, अबोलीमा, अभेळी, कौदर, सीतेची आसवं, हळुंदा, तुतारी, सापकांदा, कारवी, जांभळी मंजिरी, वायतुरा, कमोदिनी, भुई आमरी, कवला, गुलाबी तेरडा अशी अनेकविध रंगाची आणि ढंगाची फुले सगळीकडे पहायला मिळत आहेत.

त्यासाठी कास पठारला जायची गरज नसून खेड तालुक्यातील भोरगिरी, भोमळे, टोकावडे, परिसरातही ही फुले मोठ्या संखेने बहरलेली दिसतात. ही फुले या दोन महिन्याच्या कालावधीत आढळतात. ही फुले एकच जागी न दिसता त्यासाठी डोंगर रांगेत भटकंती करणे गरजेचे आहे. हा फुलोत्सव पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणारा आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news