कराड; पुढारी वृत्तसेवा : खाण पट्टा मिळावा मागण्यासाठी कराड वडार समाजाच्या वतीने शुक्रवारी कराड तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला.
खाणपट्टा देण्यास प्रशासन विलंब करत असल्याने हा गाढव मोर्चा काढण्यात आल्याचे संजय चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनामुळे वडार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला रोजगार नाही. त्यांनी जगायचे कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आधी सुचनेनुसार, नांदलापूर, केस पाडळी इथे खाण पट्टा देण्यात यावा अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली.
या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. नायब तहसीलदार विजय माने यांनी निवेदन स्वीकारले. या मोर्चात मोठ्या संख्येने वडार समाज बांधव सहभागी झाले होते.
गाढवांचा सहभाग घेतल्याने हा मोर्चा लक्षवेधी ठरला. दरम्यान या मोर्चास वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याचे सचिव शरद गाडे यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?
पाहा : ओंकारेश्वर : एक अद्भुत ज्योतिर्लिंग