सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरून दहशतवादी विरोधी पथकाच्या सेलने (एटीसी) सुमारे ११ तलवारीसह इतर हत्यारे जप्त केली. सातारा येथे गुरुवारी (दि. २९) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या घटनेने नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
अधिक वाचा
याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी रात्री एटीसीचे पथक साताऱ्यात गस्त घालत होते. यावेळी एकजण संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळला.
अधिक वाचा
यानंतर पोलिसांनी त्याला अडवून कसून चौकशी केली असता त्याच्याकडे अनेक हत्याराचे कोठार असल्याचे समजले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील ११ धारदार हत्यारे जप्त केली आहेत. आरोपीकडे सातारा पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
अधिक वाचा
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पो.नि. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली स.पो.नि शिवाजी विभुते, भोसले यांनी ही कारवाई केली आहे. अशा घटना वाढल्याने नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचलंत का?