कोल्हापूर : लाल मिरची झाली तिखट, जाणून घ्या प्रतवारीनुसार भाव

कोल्हापूर : लाल मिरची झाली तिखट, जाणून घ्या प्रतवारीनुसार भाव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अतिवृष्टीचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला असून, मिरचीचे भाव कडाडले आहेत. कर्नाटकातही मिरची पिकाचे नुकसान झाले असून, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधून आवक कमी झाली आहे. यामुळे अस्सल वाणाला धक्का लागला असून, संकरित वाणांची बाजारात आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक निम्म्यावर घटली असून, दरवाढीमुळे पुढील दोन महिन्यांत मिरची आणखी तिखट होणार असल्याची शक्यता मिरची व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

मिरचीच्या दरवाढीने वर्षभराच्या चटणीची तजवीज करणार्‍या सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. बाजारात मिरचीच्या अस्सल वाणांकडे भाववाढीमुळे दुर्लक्ष करत ग्राहक संकरित वाणांना पसंती दर्शवत आहेत. मिरचीसोबतच मसाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून, प्रत्येकाला भाववाढीचा ठसका लागतो आहे.

अस्सल वाणाच्या तुलनेत संकरित वाणाचे उत्पादन वर्षभर घेता येते. मात्र, संकरित वाणाच्या चवीमध्ये आणि त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होतो. या वाणापासून केलेली चटणी अधिक काळ टिकत नाही.

वन नॉट टू म्हणजेच 102, हैद्राबादी, रायचूर , सिजेंटा, रूद्रा अशा काही मिरचीच्या संकरित जाती आहेत. साधारण 350 ते 600 रुपयांपर्यंत प्रतिकिलो प्रतवारीनुसार त्यांची विक्री केली जात आहे. काश्मिरी रेशम पट्टा आणि संकेश्‍वरी या मिरच्यांचा सौदा गडहिंग्लज आणि कर्नाटक येथील बाजारपेठेतून होतो. या मिरचीचे दर हजार ते दीड हजारांच्या घरात असून जवारी, गुंटूर, लवंगी, रूद्रा, ब्याडगी मिरचीचे दर सध्या बाजारातील सर्वाधिक कमी म्हणजे 250 ते 300 रुपयांपर्यंत आहेत.

लाल मिरचीचे प्रतिकिलो दर

संकेश्‍वरी 750 ते 1500
काश्मिरी रेशम पट्टा 500 ते 650
ब्याडगी (केडीएल) 450 ते 600
ब्याडगी (डीडी) 400 ते 550
रुद्रा ब्याडगी 350 ते 400
सिजेंटा ब्याडगी 350 ते 400
हैदराबाद ब्याडगी 300 ते 550
तेजा/लवंगी 280 ते 300
देशी जवारी 280 ते 300
गुंटूर 180 ते 250

पाहा व्हिडिओ :

बौद्ध धर्मातील तीन पंथांसह दात्यांचे शिल्प, औरंगाबाद (राजताडगा) लेणीचे वेगळेपण

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news