नवाब मलिक यांच्या चौकशीदरम्यान ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीची जोरदार घोषणाबाजी | पुढारी

नवाब मलिक यांच्या चौकशीदरम्यान ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीची जोरदार घोषणाबाजी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. तर याच दरम्यान ईडी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ईडी कार्यलयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर पोलिस आणि कार्यकर्ते समोरा-समोर आले आहेत.

दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडी अधिकारी आज सकाळी ७ वाजता नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. सध्या त्यांची याबबातची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत सत्याच्या बाजूने न्याय होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

  • सांगलीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, तलवार, चाकू जप्त; तिघांना अटक, चौघे फरारमनिलाँड्रिंग प्रकरण व अंडरवर्ल्डशी मुंबईतील काही जमीन व्यवहारांबाबत मलिक यांची चौकशी सुरु असल्याचे समजते. राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांची ईडी चौकशी करत आहे.

हेही वाचलंत का?  

Koo App

काही बातम्या येत आहेत की, आगामी राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी नितीश कुमारजी यांच्या नावाबद्दल चर्चा सुरु झालेली आहे. जोपर्यंत ते भाजप सोडत नाहीत तोपर्यंत चर्चा करण्यासाठी हा विषय होऊ शकत नाही. आधी त्यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली पाहिजे नंतर सर्व पक्षातील नेते त्यावर विचार करतील.

Nawab Malik (@nawabmalikofficial) 22 Feb 2022

Back to top button