कोल्हापूर मधील सर्व व्यापार सोमवारपासून सुरु होणार : ललित गांधी

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन चर्चा करताना महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी. यावेळी उपस्थित आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, प्रताप पवार, सतिश माने, प्रशांत पोकळे आदी मान्यवर.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन चर्चा करताना महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी. यावेळी उपस्थित आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, प्रताप पवार, सतिश माने, प्रशांत पोकळे आदी मान्यवर.
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापार सोमवारपासून सुरू केले जातील अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

या मागणीसाठी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स' च्या पुढाकाराने 'राजारामपुरी व्यापारी असोसिएशन' ने भूमिकेला यश आले आहे.

शहर व जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना व व्यापार्‍यांच्या वतीने शासनाशी गेल्या काही दिवसांपासून लढा सुरु होता.

अधिक वाचा

आदेश निर्गमित केले जातील

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले जातील असे स्पष्ट आश्‍वासन दिल्याने, सोमवारपासून सर्व व्यापार सुरु केले जाणार आहेत.

५ दिवसांचा अपवाद वगळता जवळपास १०० दिवस सुरू असलेला लॉकडाऊन व्यापार्‍यांसाठी अत्यंत अडचणीचा ठरला आहे. वर्षभरात दोन वेळा प्रदीर्घ लॉकडाउनमुळे व्यापार्‍यांचे अर्थकारण बिघडले आहे.

वारंवार विनंत्या व मागणी करूनही सरकारकडून अपेक्षित निर्णय मिळत नसल्याने व्यापार्‍यांनी संघर्षाची भुमिका घेतली होती.

शुक्रवारपासुन व्यापार सुरू करण्याचा इशारा ललित गांधी यांनी दिला होता व त्यासाठी शुक्रवारी सभा बोलविण्यात आली होती.

तत्पूर्वी ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज (ता.१६) जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनाममध्ये व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

अधिक वाचा 

अधिकार्‍यांना प्रस्ताव देण्याच्या सूचना

राजेश टोपे यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्यास अनुकुलता दाखवली व अधिकार्‍यांना तसा प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे व जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडताना व्यापार्‍यांची मागणी योग्य असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी शिष्टमंडळात प्रशांत पोकळे, माणिक पाटील-चुयेकर, सतिश माने, अनिल पिंजाणी, शाम बासराणी, जयंत गोयाणी, किरण नकाते, मनोज बहिरशेठ, दिपक पुरोहित, प्रताप पोवार, दर्शन गांधी आदींचा समावेश होता.

आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीनंतर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी जनता बझार चौक येथील सभेमध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या व्यापार्‍यांना माहीती दिली.

सर्वांनी एकमताने सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सभेचा समारोप करताना ललित गांधी यांनी या लढ्यामध्ये साथ दिलेल्या सर्व व्यापारी व संघटनांचे आभार मानले.

तसेच हा निर्णय होण्यामागे सहकार्य केलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व मंत्री जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, राज्य सरकार विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

हे वाचलं का? 

https://youtu.be/0r76elg4NLE

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news