मुंबई; पुढारी ऑनलाईन : एक अतिशय खास चित्रपट 'शर्माजी नमकीन'च्या पोस्टरचे अनावरण झाले. यामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांमधील एक ऋषी कपूर आहेत. ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे शानदार आणि दमदार चित्रपट पाहायला मिळणार आहे. अद्वितीय काम आपल्या सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा आहे.
अधिक वाचा-
त्यांच्याविषयीचे प्रेम, सन्मान आणि आठवणींच्या रूपात पाहता येणार आहेत. त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी ते भेट म्हणून त्यांच्या अंतिम चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या 'फर्स्ट लूक'चे अनावरण झाले.
अधिक वाचा-
परेश रावल यांचीदेखील या चित्रपटात भूमिका आहे. त्यांनी ऋषी यांच्याद्वारे साकारण्यात येणाऱ्या व्यक्तिरेखेला चित्रीत करण्यासाठी हा चित्रपट पूर्ण केला.
एक्सेल एंटरटेनमेंट आणि मॅकगफिन पिक्चर्सद्वारे या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. नवोदित हितेश भाटियाद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. हा चित्रपट एका प्रेमळ ६० वर्षीय व्यक्तीची कथा आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन डेब्यू दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी केले आहे. चित्रपट रितेश सिधवानी, फरहान अख्तर. तसेच हनी त्रेहान, अभिषेक चौबे यांची निर्मिती आहे. कासिम जगमगिया यांचीही सह-निर्मिती आहे.
'बॉबी' हा त्यांचा नव्हाळीतील चित्रपट होता. या चित्रपटाताल गाणी सुपरडूपर हिट ठरली. आज काळ लोटला. ऋषीही या जगात नाहीत. तरीही त्यांची गाणी आजही अनेकांच्या ओठावर रूळतात.
ऋषी यांच्यासारखं स्पिरीट इतरांकडे म्हणावं तसं त्याकाळी नव्हतं. 'बॉबी'ला मिळालेल्या यशानंतर एकामागोमाग एक चित्रपट त्यांनी दिले. त्यांनी डिंपल कापडियाबरोरच पद्मिनी कोल्हापुरे, जया प्रदा, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, दिव्या भारती, रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला या अभिनेत्रींसोबत काम केलं.
अधिक वाचा-
ऋषी यांनी आपल्या करिअरमध्ये ९२ चित्रपटांमध्ये रोमँटिक हिरोची भूमिका साकारली होती. (१९७३ ते २००० पर्यंत)
ऋषीने 'मेरा नाम जोकर'मधून एक बालकलाकार मधून सिनेजगतात पाऊल ठेवलं. या चित्रपटासाठी त्यांना डेब्यू बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. परंतु, एक अभिनेता म्हणून 'बॉबी' हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
'दो दूनी चार', 'अग्निपथ', कपूर ॲण्ड सन्स, राजमा चावल, बेशरम, स्टुडंट ऑफ द ईअर, पटियाला हाऊस, १०२ नॉट आऊट, 'मुल्क'. अशा चित्रपटांतून वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा त्यांनी रंगवल्या.
प्रत्येक भूमिकेला परफेक्ट असणारे ऋषींनी रोमँटिकचं नव्हे तर गंभीर भूमिकाही केल्या. 'मुल्क' या चित्रपटातील त्यांची एका मुस्लिम व्यक्तीची रेखाटलेली भूमिका कौतुकास्पद होती. 'मुल्क'मधील त्याची अत्यंत सुंदर भूमिका होती.
मेरा नाम जोकर, नगीना, दिवाना, हिना, चांदनी, प्रेम रोग, लैला मजनू, बंजारा, बोल राधा बोल, साजन का घर, कर्ज. तर प्रेम ग्रंथ, दामिनी, नसीब अपना अपना, अजुबा, दरार, अमर अकबर ॲन्थोनी. त्याचबरोबर बडे घर की बेटी, घराना, ये वादा राहा, हम किसीसे कम नहीं, लव्ह आज कल, प्यार के काबिल, नमस्ते लंडन. रफू चक्कर, दो प्रेमीं, गुरुदेव, हम दोनों यासारख्या चित्रपटांतून ऋषी यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या होत्या.