आंबा घाट बंद : १२ ठिकाणी दरड कोसळल्या, पाच दिवस रस्ता बंद

आंबा घाट बंद : १२ ठिकाणी दरड कोसळल्या, पाच दिवस रस्ता बंद
आंबा घाट बंद : १२ ठिकाणी दरड कोसळल्या, पाच दिवस रस्ता बंद

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अंबा घाटात विविध १२ ठिकाणी दरडी कोसळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस दुरुस्तीच्या कारणास्तव आंबा घाट बंद असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा या दरम्यान आंबा घाटात 12 ठिकाणी दरड कोसळल्यामुळे व तीन ठिकाणी रस्त्याच्या भाग तुटल्यामुळे महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे पाच दिवस दुरुस्तीसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक भागांना पुराचा तडाखा बसला तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणार्‍या आंबा घाटात तब्बल बारा ठिकाणी दरड कोसळून मोठ्याप्रमाणात माती व दगडांचा मलबा रस्त्यावर आला आहे.

तीन ठिकाणी दरीच्या बाजूने रस्त्याला भेगा जावून हा भाग तुटला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावरील मलबा काढण्याचे काम यद्ध पातळीवर सुरू आहे आणि खचलेला भराव दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

हे दुरुस्तीचे काम पुढील पाच दिवस चालू राहणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर सदर महामार्गाची पुन्हा पाहणी करून, महामार्गावर फक्त हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूरचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अधिक वाचा :

रघुवीर घाटात दरड कोसळली

दरम्यान, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्‍या खेडमधील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरड कोसळल्याची बाब निदर्शनास आली असून, त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून कंदाटी खोर्‍यातील 16 गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे.

एका बाजूला कोयना धरणाचा विराट जलाशय तर दुसरीकडे रघुवीर घाटात कोसळलेली दरड यामुळे या सोळा गावांत कोणाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर ती पोहोचवण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे. दरम्यान, ही घटना घडून चार दिवस उलटले तरी अद्याप या घटनेकडे राज्य सरकारने गंभीरपणे पाहिलेले नसल्याची बाब समोर येत आहे.

राज्य सरकारने तातडीने 'त्या' सोळा गावांत संपर्क प्रस्थापित करून तेथे अडकलेल्या शेकडो लोकांना मदतीचा हात तातडीने देण्याची गरज आहे. सातारा जिल्ह्याच्या नकाशात समावेश असलेल्या कांदाटी खोर्‍याचा संपर्क कोयना धरणाच्या जलसाठ्यामुळे तुटला. या खोर्‍यात 16 गावे असून संपर्कासाठी आणि दळणवळणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील खोपी येथून सुरू होणारा रघुवीर घाट हा एकमेव मार्ग आहे.

मात्र, 22 जुलैच्या अतिवृष्टीत रघुवीर घाटाचे मोठे नुकसान झाले आहे. घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून दगड व मातीचे ढिगारे रस्त्यावर आले आहेत.

काही ठिकाणी शंभर ते तीनशे मीटर अंतरात दरड कोसळली आहे तर काही ठिकाणी रस्त्याचाच भाग दरीत कोसळला असल्याने पुढील पंधरा ते वीस दिवस घाटातून वाहतुक सुरू होणे कठीण आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news