कीव्ह : पुढारी ऑनलाईन
रशिया-युक्रेन युद्धाचा आज २८ वा दिवस आहे. रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हसह अन्य शहरांवर हल्ले करत आहे. दोन्ही देश तडजोडीला तयार नाही. या परिस्थितीत युक्रेनबरोबर चर्चा होणे खूपच कठीण आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मैरियूपोल शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठी भीती व्यक्त केली आहे.
मैरियूपोल शहारात रशियन सैन्याने वेढा दिला आहे. येथे एक लाखांहून अधिक नारिकांना बंदी बनविण्यात आले आहे. विना अन्न-पाणी हे नागरिक शहरात अडकले आहेत. येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष नरसंहार घडविण्याच्या तयारीत आहेत, असेही झेंलेन्स्की यांनी म्हटले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 'नाटो'समोर आपली बाजू मांडणार आहेत. 'नाटो'समोर ते कोणती मागणी करणार याकडे रशियाचेही लक्ष असणार आहे. दरम्यान, अमेरिकेनेही रशियाविरोधात कठोर प्रतिबंध लादले आहेत. तसेच यापुढे जी-२० समुहात रशियाबरोबर पूर्वीसारखा व्यापार होईल, असे वाटत नाही, असेही स्पष्ट केले आहे.
हेही वाचलं का?