पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिदुगु रुद्र राजू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी नुकत्याच काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांच्या कन्या वायएस शर्मिला ( YS Sharmila) यांची वर्णी लागेल, अशी शक्यता आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. काँग्रेसकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांच्या कन्या आणि विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण वायएस शर्मिला यांनी त्यांच्या वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे कारण तो सर्व समुदायांची सेवा करतो आणि सर्व वर्गांना एकत्र करतो, असे त्यांनी यावेळी नमूद केले होते.
हेही वाचा :